एक लाखाची लाच घेताना म्हाडाचा शाखा अभियंता रंगेहाथ सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुरुस्तीच्या कामांचे लाखो रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी बांधकाम कंत्राटदाराकडे एक लाखाची लाच मागून ती रोकड स्विकारताना म्हाडाच्या शाखा अभियंत्यास अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. राजकुमार वरुडे (53) असे त्या अभियंत्याचे नाव असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी हे बांधकाम कंत्राटदार असून त्यांनी म्हाडाअंतर्गत असलेल्या इमारत दुरुस्तीची कामे घेतली होती. त्यानुसार 2019 -2020 दरम्यान त्यांना ‘ए’ वॉर्डातील 36 दुरुस्तीची कामे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही कामे पूर्ण केल्याने त्याचे 22 लाख 60 हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी फिर्यादी शाखा अभियंता राजकुमार वरुडे यांना भेटले होते. वरुडे यांनी हे लाखो रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी एक लाखाची मागणी केली. मात्र लाच द्यायची नसल्याने बांधकाम व्यावसायिकाने अॅण्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली. त्यानंतर वरुडे यांना एक लाखाची लाच घेताना आज रंगेहाथ पकडले.