पेण अर्बन बँकेच्या जमिनींवर उभ्या राहणार म्हाडाच्या इमारती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग 

ठेवीदारांचे अडकलेले कोटय़वधी रुपये परत मिळावे यासाठी पेण अर्बन बँकेचा मालमत्ता विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये बँकेच्या काही जमिनी ताब्यात घेऊन त्यावर म्हाडाचे गृहनिर्माण प्रकल्प उभे केले जाणार आहेत. त्याचबरोबर सिडकोलाही काही मालमत्ता विकत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आयुष्यभराची पुंजी परत मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे आंदोलने करणाऱया लाखो ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.

पेण अर्बन सहकारी बँकेत झालेल्या कोटय़वधीच्या घोटाळ्याचा फटका सुमारे अडीच लाख ठेवीदारांना बसला आहे. याविरोधात अनेकदा आंदोलने झाली होती. अखेर सरकारने ठेवीदारांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागपूर येथील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांबरोबर चर्चा केली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, रायगडचे जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दोषींवर कडक कारवाई करा

ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यासाठी ऍक्शन प्लॅन करतानाच मुख्यमंत्र्यांनी घोटाळ्यांना जबाबदार असणाऱया दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यासाठी गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिवांना लक्ष देण्यास सांगितले आहे.

सिडकोच्या क्षेत्रातील पेण अर्बन बँकेच्या ज्या प्रॉपर्टी सिडकोला खरेदी करणे शक्य आहेत त्या खरेदी कराक्यात.

इतर भागातील प्रॉपर्टीची खरेदी प्रधानमंत्री आकास योजनेच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी करण्यास म्हाडाला सांगण्यात येईल. या प्रॉपर्टीच्या किक्रीतून जास्तीत जास्त ठेकीदारांच्या ठेकी परत करण्यात येणार आहेत.

दोषींकर कडक कारकाई करू, कोणालाही पाठीशी घालणार नाही, ठेकीदारांच्या ठेकी परत मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणेने कारकाई कराकी, अशा सूचना देण्यात आल्या