
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाकडे नवीन गृहप्रकल्प उभारण्यासाठी सध्या जमिनी शिल्लक नाहीत. त्यामुळे गृहप्रकल्प उभारणीसाठी 350 हेक्टर सरकारी जमिनी मिळाव्यात, अशी मागणी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) घरांकडे नागरिकांचा कल आहे. कोकण मंडळाने ठाणे, वसई, नवी मुंबईतील 5285 घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यासाठी दीड लाखाहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. यावरून एमएमआर परिसरातील घरांनाही नागरिकांची मोठी मागणी असल्याचे दिसतेय. येत्या काळात कोकण मंडळाला सर्वसामान्यांसाठी मोठया प्रमाणात परवडणाऱया घरांची निर्मिती करायची आहे. परंतु इतका मोठा गृहप्रकल्प उभारण्यासाठी कोकण मंडळाकडे मोकळा भूखंड उपलब्ध नाही. त्यामुळे ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, पालघर, रायगड येथील सुमारे 350 हेक्टर सरकारी भूखंडाची मागणी राज्य सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
No Land Left for New Houses! MHADA Konkan Board Demands 350 Hectares
MHADA Konkan Board faces land shortage for new housing projects. A request for 350 hectares of government land in Thane, Palghar, and Raigad has been sent to the State Govt.






























































