दुहेरी हत्याप्रकरणी एकाला अटक

बोरिवली येथील दुहेरी हत्या प्रकरणी एकाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. अरमान शेख असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बोरिवलीच्या गणपत पाटील नगर येथे शेख आणि गुप्ता कुटुंबीय राहत होते. दोन्ही कुटुंबीयांमध्ये जुना वाद होता. पाच दिवसांपूर्वी क्षुल्लक वादातून दोन्ही कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला. त्यात तिघांचा मृत्यू, तर चौघे जखमी झाले होते. घडल्या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन गुन्हे नोंद करून तपास सुरू केला. तपास हाती येताच पोलिसांनी अमर गुप्ताला अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाचा सहभाग आढळल्याने त्याची रवानगी बालगृहात करण्यात आली. रामनवल आणि अरविंदच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी अरमानला ताब्यात घेऊन अटक केली.