स्टार्कने मॅग्राथचा विक्रम मोडला, एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्सची नोंद

63

सामना ऑनलाईन । बर्मिंघम

वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमी फायनल लढतीत बेअरस्टोचा बळी घेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम नोंदवला आहे. स्टार्कच्या नावावर वर्ल्डकप 2019 मध्ये 27 बळींची नोंद झाली आहे. स्टार्कपूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मेग्राथच्या नावावर होता. मेग्राथने 2007 च्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना एकूण 26 बळी घेतले होते.

एकाच वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज –

मिशेल स्टार्क – 27 बळी (2019)
ग्लेन मेग्राथ – 26 बळी (2007)
चामिंडा वास – 23 बळी (2003)
शॉन टेट – 23 बळी (2007)
मुथय्या मुरलीधरन – 23 बळी (2007)

आपली प्रतिक्रिया द्या