काय म्हणताय! बिल गेट्स पुन्हा प्रेमात? वाचा कुणाचं नाव चर्चेत

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या प्रेमसंबंधाविषयी माहिती समोर आली आहे. बिल गेट्स यांचे 2021 मध्ये मेलिंडा गेट्सपासून यांच्या हाय-प्रोफाइल घटस्फोटानंतर, 67 वर्षीय अब्जाधीश बिल गेट्स हे 60 वर्षीय पॉल हर्डला डेट करत असल्याची माहिती विदेशी मीडियामध्ये चर्चेत आहे. इंग्रजी मीडिया डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बिल गेट्स आणि पॉल हर्ड एकत्र टेनिस सामन्याचा आनंद लुटत होते, त्या दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स आणि पॉल हर्ड अलीकडेच जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकत्र दिसले होते. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात हे दोन्ही जोडपे एकत्रच बसलेले होते. तसेच ऑस्ट्रेलियन ओपन पाहिल्यानंतर बिल गेट्स आणि पॉल हर्ड मेलबर्नहून सिडनीला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना भेटण्यास गेले होते. डेली मेलच्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, बिल गेट्स आणि पॉल हर्ड हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. पॉल हर्डला अनेकदा मिस्ट्री वुमन म्हटले जायचे परंतू या दोघांच्याही जवळच्या लोकांना यांच्या प्रेमसंबंधाविषयी माहिती होती.

कोण आहे पॉला हर्ड ?

पॉल हर्ड या ओरॅकलचे चेअरमन मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क हार्ड यांचे 2019 मध्ये निधन झाले. तर, पॉल हर्ड एक माजी टेक एक्झिक्युटिव्ह असून, आता एक समाजसेविका आणि कार्यक्रम नियोजक आहे. तसेच लिंक्डइन प्रोफाइलनुसार, पॉल यांनी ऑस्टिन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधून मार्केटिंगमध्ये बॅचलर केले आहे. दरम्यान मार्क हर्ड यांना टेनिस खेळण्याची आवड होती. 2015 मध्ये पॉल हर्डने कॅलिफोर्नियामध्ये टेनिस सामन्यादरम्यान बिल गेट्सच्या मागे उभे राहून फोटोही काढले होते. टेनिसमुळेच हे दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे मानले जात आहे.