मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांचा 24 फेबुवारीला हिंदुस्थान दौरा

मायक्रोसॉफ्ट या प्रतिष्ठत कंपनीचे सीईओ सत्या नडेला 24 फेबुवारीला हिंदुस्थान दौऱयावर येत आहेत. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार नडेला 24 ते 26 फेब्रुवारीला हिंदुस्थानच्या दौऱयावर येण्याचा विचार करीत आहेत. यादरम्यान ते दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईला जातील. नडेला देशातील प्रमुख उद्योगपतींची भेटही घेणार आहेत. गेल्या महिन्यात सीएए विरोधात भाष्य करून नाडेला चर्चेत आले होते. त्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

नडेला यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) विरोधात होत असलेल्या आंदोलनावर मतप्रदर्शन केले होते. ते म्हणाले की, हिंदुस्थानातील घटना खूप दुखद आहे. एखाद्या बांग्लादेशी व्यक्तीने हिंदुस्थानात मोठी कंपनी सुरू केली किंवा इन्फोसिससारख्या मोठय़ा कंपनीचा सीईओ झाला तर मला आनंद होईल. नडेला यांच्या या वक्तव्याकर भाजपने तीव्र निंदा केली होती. नंतर मायक्रोसॉफ्टने नडेला यांच्याकडून एक विधान जारी केले होते की, देशाला आपल्या सीमेचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे.

मायक्रोसॉफ्टकडून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नडेला यांच्या भेटीचे प्रयत्न केले जात असल्याचे समजते. मायक्रोसॉफ्टकडून नडेला यांच्या दौऱयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या