नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ, तिघांची टोळी जेरबंद

दिंडोशी येथील शिवाजीनगर परिसरात नामांकित कंपनीच्या दुधात भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेलणार्या तिघांचा गोरखधंदा मुंबई गुन्हे शाखेच्या युनीट-12 च्या पथकाने उद्धवस्त केला. त्या भेसळखोरांकडून तब्बल 603 लिटर भेसळयुक्त दुध जप्त करुन त्याची विल्हेवाट लावली.

दिंडोशी येथील शिवाजीनगर परिसरात काही इसम नामांकित दुधात भेसळ करीत असल्याची खबर युनीट-12 चे पोलिस निरीक्षक सचिन गवस यांना मिलाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे, गवस तसेच एपीआय सावंत व पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासह त्यासाठी आज पहाटे छापा टाकला. त्यावेली रामकृष्ण, महेश आणि सुरेश हे तिघे दुधात भेसळ करताना रंगेहात सापडले. हे तिघे अस्वच्छ पाणी नामांकित दुधात मिक्स करीत होते.

आपली प्रतिक्रिया द्या