दूध पाच रुपयांनी महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गाईच्या प्रतिलिटर दुधाला २५ रुपये दर देणे सरकारने बंधनकारक केले आहे. त्याबदल्यात दूध पावडर तयार करणाऱ्या संघांना पाच रुपये अनुदान सरकारने जाहीर केले असले तरी पिशवीबंद दुधाला मात्र अनुदान नाकारले आहे. त्याचा फटका दूध संघांना बसू लागला आहे. त्यामुळे त्यांनी आपला तोटा कमी करण्यासाठी विक्री दरात आजपासून लिटरमागे दोन ते पाच रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांकडून स्वस्तात दूध मिळत असल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी १६ दूध संघांनी आपला विक्री दर दोन रुपयांनी कमी करून ४० ते ४२ रुपयांपर्यंत खाली आणला होता, मात्र आता सरकारनेच शेतकऱ्यांच्या दुधाला २५ रुपये दर देणे बंधनकारक केल्याने कमी दराने दुधाची विक्री करणे परवडत नसल्याचे कारण देत कुतवळ, ऊर्जा, एस. आर. थोरात, चितळे, साईनंद, स्वराज, नेचर, सोनाई, मुक्ताई, शिवरत्न अशा छोटय़ा ब्रॅण्डच्या डेअऱ्यांनी दुधाचे दर दोन ते पाच रुपयांनी वाढवून पूर्वीएवढेच केले आहेत.