…तर निवडणुकीत जागा दाखवून देऊ; गिरणी कामगारांचा इशारा

फोटो - रुपेश जाधव

गिरणी कामगार आणि वारसांनी हक्काच्या घरासाठी शुक्रवारी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून लालबाग येथील भारतमाता सिनेमाजवळ लाक्षणिक उपोषण केले. विविध कामगार संस्था आणि संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषण आंदोलनात कामगार आणि त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. मिंधे सरकारच्या पोलिसांनी उपोषणासाठी मांडव उभारण्यास कामगारांना मनाई केली. मिंधे सरकारने गेली अनेक वर्षे कामगारांना केवळ आश्वासने देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसल्यामुळे गिरणी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सरकारने घरांबाबत तातडीने निर्णय घ्यावा म्हणून कामगारांनी आणखी पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.