बर्गर खाण्याची इच्छा झाली; 2 लाखांत हेलिकॉप्टर बुक करून गाठले 362 किलोमीटरवरील रेस्टॉरंट

आपल्याला वडापाव, समोसा खाण्याची इच्छा झाली की आपण जवळची टपरी किंवा एखादे रेस्टॉरंट पाहून जिभेचे चोचले पुरवतो. मात्र, एखाद्या श्रीमंताला अशी इच्छा झाली तर….आणि जवळच्या परिसरात आवडीचे रेस्टॉरंट नसेल तर ती व्यक्ती काय करेल…विचार करा. एका श्रीमंत व्यक्तीला बर्गर खाण्याची इच्छा झाली. त्याने 2 तासांसाठी हेलिकॉप्टर बुक केले आणि 362 किलोमीटरवरील मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट गाठून जिभेचे चोचले पुरवले आहेत.

रशियातील विक्टर मार्टिनोव यांना बर्गर खाण्याची इच्छा झाली. त्यांनी जवळचे सर्व रेस्टॉरंट ऑनलाइनवर सर्च केले. कोणतेही रेस्टॉरंट त्यांच्या पसंतीला उतरले नाही. त्यामुळे त्यांनी दोन तासांसाठी हेलिकॉप्टर बुक केले. हेलिकॉप्टरने 362 किलोमीटरवरील मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट गाठून त्यांनी बर्गरचा आस्वाद घेतला. आता दोन तासांसाठी हेलिकॉप्टरचा खर्च आणि बर्गरचा खर्च आणि त्यांनी केलेला प्रवास याचा विचार आपल्या मनात येईल. पण हौसेला मोल नसते, हेच या घटनेवरून दिसून येते. ‘मिरर युके’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

विक्टर यांचा खासगी याटचा व्यवसाय असून ते करोडपती आहेत. आपले आवडते रेस्टॉरंट गठण्यासाठी विक्टर यांनी सुमारे 2 लाख रुपये खर्च केले आहेत. आपल्या प्रेयसीला घेऊन ते या रेस्टॉरंटमध्ये हेलिकॉप्टरने बर्गर खाण्यासाठी पोहचले. विक्टर क्रीमियामध्ये सुटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना मॅकडोलनाल्डचा बर्गर खाण्याची इच्छा झाली. या इच्छेसाठी त्यांनी 2 लाखांचा खर्च केला.

क्रीमियातील जवळच्या रेस्टॉरंटची त्यांनी ऑनलाइनवर माहिती घेतली. त्यातील कोणेतही त्यांच्या पसंतीला उतरले नाही. त्यामुळे थेट हेलिकॉप्टर बुक करून त्यांनी क्रीमिया ते क्रासनोडर असा 362 किलोमीटरचा प्रवास केला. आवडत्या रेस्टॉरंटमध्ये पोहचल्यावर त्यांनी बिग मॅक, फ्रेंच फ्राइज, मिल्कशेकची ऑर्डर दिली. त्या सर्वांचे बिल 4,859 रुपये आले. तर हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्च दोन लाख रुपये आला. याआधी फक्त बर्गर खाण्यासाठी हेलिकॉप्टर बुक केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे हेलिकॉप्टर कंपनीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या