मायक्रोसॉफ्टची 4.4 कोटी  युजर्स लॉगइन हॅक

383

मायक्रोसॉफ्टची तब्बल 4.4 कोटी युजर्स लॉगइन हॅक करण्यात आली असून हॅक करण्यात आलेले पासवर्ड आणि युजरनेमचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती पीसी मॅगच्या अहवालातून उघड झाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या रिसर्च टीमने केलेल्या डेटा ऍनालिसीसमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यानची सर्व अकाऊंट तपासण्यात आली. त्यावेळी हे अकाऊंट युजर्स हॅक पासवर्ड आणि युजरनेमचा वापर दुसर्‍या प्लॅटफॉर्मसाठी करत असल्याची बाब समोर आली.

कंपनीच्या रिसर्च टीमने 2019 मध्ये लीक झालेल्या 3 अब्जहून अधिक पासवर्ड आणि युजर नेमचे डेटाबेस संबंधित अकाऊंटशी जुळवून पाहिले होते.  ज्यांचे अकाऊंट मॅच झाले त्यांना आपल्या अकाऊंटचा पासवर्ड रिसेट करण्यास सांगण्यात आला आहे.

हॅक अकाऊंटची संख्या पाहिली तर 99.9 टक्के हॅकिंग एमएफए अर्थात मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून रोकल्याचेही मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. एमएफए हे सॉफ्टवेअर ऑनलाइन अकाऊंटच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रक्रिया असल्याचे युजर्सना सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या