Video – महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवाच, अशोक चव्हाण यांचे आव्हान

देशातील ज्या राज्यात बिगर भाजप राज्य आहे, तिथले सरकार पाडण्याचे कारस्थान केंद्र सरकार करत आहे, असे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तसेच राज्यातील  महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवाच असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले आहे.

चव्हाण मराठावाडा दौर्‍यावर आहेत. संभाजीनगरमध्ये बोलताना चव्हाण म्हणाले की, “देशात ज्या ज्या ठिकाणी भाजपचे राज्य नाही, ज्या राज्यात बिगर भाजपचे सरकार आहे, त्या ठिकाणी सरकार पाडण्याचे कारस्थान केंद्र सरकार करत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले ते योग्य आहे. भाजपला हे आमचे आव्हान आहे की त्यांनी आमचे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवावे.”

रविवारी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पुढच्या महिन्यात आपल्या सरकारला एक वर्ष होत आहे. समोरचे तारीख पे तारीख देत आहेत. देऊ द्यात. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदी बसून कारभाराला सुरुवात केली त्या दिवसापासून अनेक जण स्वप्न बघत आहेत की हे सरकार पडेल, सरकार पाडू. तेव्हा दिलेले आव्हान मी आजसुद्धा देतोय. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हान पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

आपली प्रतिक्रिया द्या