सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना पॉझिटिव्ह

914

सहकार पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यांना कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. पाटील यांची प्रकृती लवकर बरी व्हावी. यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रार्थना केली आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, किरकोळ त्रास जाणवू लागल्यामुळे मी काल कोरोना चाचणी केली. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती चांगली आहे. काही काळजी करण्यासारखे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल झालो आहे. आपण घरी रहा, सुरक्षित रहा, स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे नागरिकांना रुग्णालयातून आवाहन केले आहे.

दरम्यान पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या व संपर्कात आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने असे आवाहन केले आहे की, गेल्या पाच दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांना विनंती करतो की, आपण स्वतःला विलगीकरण करावे व आपली तपासणी करून घ्यावी.

आपली प्रतिक्रिया द्या