आमच्याकडे धनुष्यबाण, मजबुत हात अन् अचूक वेळ साधणारे घड्याळही आहे – छगन भुजबळ

1599
chhagan-bhujbal

आमच्याकडे धनुष्यबाण, मजबुत हात आणि अचूक वेळ साधणारे घड्याळ आहे, असा सणसणीत टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला हाणला.

नाशिकमध्ये छगन भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात ऑपरेशन कमळ ही भाजपाची मोहीम सुरू होणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. आमच्याकडे धनुष्यबाण आहे, मजबुत हातही आहे आणि अचूक वेळ साधणारे घड्याळही आहे, यामुळे कोणीही काळजी करू नये, असा टोला त्यांनी भाजपाला हाणला.

आपली प्रतिक्रिया द्या