मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारला अपघात

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पुणे- सोलापूर मार्गावरील सोरतापवाडी येथे गुरुवारी पहाटे अपघात झाला. ट्रव्हल्सची धडक बसून झालेल्या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत.

पुणे ते सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यांची कार आणि ट्रव्हल्स दोन्ही वाहने पुण्याच्या दिशेने येत होती. ऐनवेळी ट्रव्हल्ससमोर एक गाडी आल्याने त्यांनी ब्रेक दाबला. त्यामुळे  पाठीमागे असलेल्या मुंडे यांच्या कारला ट्रव्हल्सची धडक बसली. यात राजश्री मुंडे यांच्या कारच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले.