दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

कामगार व राज्यउत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटील हे एखनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमात हजर राहिले होते.

नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास होत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवरून केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या