मोदी सरकारमधील मंत्र्यांने संसदेत मसूद अजहरला म्हटले ‘साहेब’, दहशतवाद्यांचा केला ‘शहीद’ असा उल्लेख

 

पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान बोलताना मोदी सरकारमधील पंचायत राज्य मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी दहशतवादी मसूद अजहरला ‘साहेब’ म्हटले आहे. तसेच त्यांनी दहशतवाद्यांचा देखील शहीद असा उल्लेख केला.