सत्तांतरानंतर मराठा समाजाला लगेचच आरक्षणाची खाज सुटली, तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य

शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत हे कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एका नव्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे अड़चणीत आले आहेत. ”राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मराठा समाजाला लगेच आऱक्षणाची खाज सुटली” असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा समाज भडकला असूनि मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रविवारी धाराशीव येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ” आता मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी किंवा अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यामागचा कर्ता करविता कोण आहे, हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली” असे तानाजी सावंत म्हणाले.

मराठा क्रांती मोर्चाने केली माफीची मागणी

मराठा क्रांती मोर्चानेदेखील नाराजी व्यक्त केली असून आपल्या वक्तव्यावर माफी मागा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.