आमच्यातील कोणी सोडून गेल्यास त्याला बदडून काढू – यशोमती ठाकूर

3131

राज्यातलं सरकार स्थिर आहे. कुणी हे सरकार अस्थिर करायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असे विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. तसेच भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.

नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. आमचे कुणी फुटणार नाहीत, उलट भाजपच्या 105 पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले. तसेच आमच्यातील कोणी सोडून गेल्यास त्याला बदडून काढू असा इशारा त्यांनी दिला.

 

कर्नाटक, मध्यप्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये आपला घाणेरडा खेळ आणि राजकारण सुरू केले आहे. शेणातला किडा जसा शेणात राहतो, त्याप्रमाणेच केंद्रात एवढी मोठी एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही भाजप राज्यात घाणेरडा खेळ करत असून त्यांची हाव सुटलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या