
पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आता हिंदुस्थानने पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद व लाहोर, कराची सारख्या मोठ्या शहरांवर देखील हिंदुस्थानने हल्ले करत पाकड्यांचे कंबरडे मोडले आहे.
या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने एक ट्विट करत आम्ही सज्ज आहोत असा इशाराच पाकिस्तानला दिला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर, जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर आज पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही. पाकिस्तानच्या हल्ल्यांना हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिले. आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचे व जनतेचे संरक्षण करायला आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असे ट्विट संरक्षण मंत्रालयाने केले आहे.