पुणे शहरात फिरण्यासाठी चोरली दुचाकी, अल्पवयीन ताब्यात

पुणे शहरात फिरण्याची हौस भागविण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीनाला समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तरूणाने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गणेशोत्सवामुळे शहराच्या मध्यवर्ती वाहनांच्या पार्किंगला जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकांकडून रस्त्यालगत दुचाकींचे पार्किंग केले जाते. नेमकी तीच संधी साधून एका अल्पवयीनाने फिरण्याची हौस भागविण्यासाठी दुचाकी चोरून नेली.

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेउन वडिलांसमक्ष विचारपूस केली असता, मौजमजा आणि फिरण्याची दुचाकीची चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, एपीआय संदीप जोरे, सतीश भालेराव, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, शुभम देसाई, सुभाष मोरे, नीलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या