पेनसाठी दहा वर्षांच्या मुलीने आठवीच्या मुलीची केली हत्या

621

पेनवरून झालेल्या भांडणातून दहा वर्षांच्या विद्यार्थिनीने आठवीत शिकणाऱ्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्या लपविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिच्या आईवडिलांना अटक केली आहे.

जयपूरच्या चाकसू परिसरात आठवीत शिकणारी मुलगी मृतावस्थेत आढळली होती. परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती तेव्हापासून ती बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला होता. बुधवारी एका मुलीने आठवीत शिकणाऱ्या मुलीचा पेन हिसकावून घेतला होता. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता. काही वेळाने भांडण मिटलेही होते, मात्र पीडित मुलगी घरी जात असताना वाटेत दोघींमध्ये पुन्हा वाद झाला. अल्पवयीन मुलीने आधी आठवीतल्या मुलीवर लोखंडी कांबीने हल्ला केला. त्यानंतर धारदार वस्तूने तिच्यावर तब्बल 19 वेळा वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या