जीवघेण्या आजारामध्ये जी काळजी घेत होती तिच्यावरच 65 वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना खारमध्ये घडली आहे. पीडिता ही आरोपीच्या लिव इन पार्टनरची दत्तक मुलगी आहे. आरोपीविरोधात खार पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला कँसरचा आजार आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पीडित मुलीला आरोपीच्या लिव्ह इन पार्टनरने तीन महिन्यांपूर्वीच दत्तक घेतले होते. दोघी मिळून आरोपीची काळजी घेत होत्या. माञ शनिवारी पीडित तरुणी एकटी घरी असताना आरोपीची नियत बिघडली. आरोपीने आधी मुलीची छेड काढली मग तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीच्या लिव्ह इन पार्टनरच्या फिर्यादीवरुन खार पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.