अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी कँडल मार्च काढून निषेध

563

इचलकरंजी येथे आठ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी रात्री शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात तीव्र संताप व्यक्त केला गेला. शहरातून कॅण्डल मार्च व निषेध मोर्चा काढून निदर्शने करून मोर्चाद्वारे कुरुंदवाड पोलीस स्टेशनला चार नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

शिवसेना, महिला आघाडी, यांच्यासह विविध संघटना, तरुण मंडळे, महिला आणि नागरिकांनी एकत्र येऊन कँडल मार्च आणि निषेध मोर्चात सहभागी होऊन निदर्शने नोंदवली आणि संबंधित चार नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी लहान मुलीच्या हस्ते कुरुंदवाड पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले.

दीपावलीचे आनंदोत्सव साजरा होत असताना इचलकरंजी येथे निंदनीय आणि  घृणास्पद घटना घडली चार नराधम  युवकांनी पहाटेच्या सुमारास आठ एक आठ वर्षीय मुलीचे मोटरसायकलवरून अपहरण करून तिच्यावर कोरची (ता. हातकणंगले) येथे सामूहिक अत्याचार केले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी रात्री कुरुंदवाड शहरवासीय एकत्र येऊन ईगल चौक येथून कॅन्डल मार्च व निषेध फेरी काढली. त्यावेळी ईगल चौकातून सुरू झालेल्या कॅन्डल मार्च सन्मित्र भालचंद्र चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नगरपालिका चौक दर्गा ते कुरुंदवाड पोलीस स्टेशन या मार्गाने मोर्चाने कुरुंदवाड पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन चार चिमुकलीच्या हास्ते देण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, बाबासाहेब सावगावे, महिला आघाडीच्या शहरप्रमुख वैशाली जुगळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिग्विजय चव्हाण, सौरभ जासूद, आलफताह संघटनेचे सलीम दबासे, रोटरी क्लबचे विष्णुंपंत माळी, लायन्स क्लबचे रविकिरण गायकवाड  सामाजिक कार्यकर्ते संदीप आडसुळ आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी, तरुण मंडळ आणि शहरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या