गरब्याहून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

गरबा पाहून घरी परत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहितीही मिळत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. पीडिता बुधवारी रात्री 11 वाजता गरबा पाहून घरी परत जात होती. तिच्यासोबत तिची चुलत बहीण देखील होती.

वाटेत त्यांना चना आणि गोविंद हे दोघे भेटले. त्यांनी पीडितेच्या बहिणीला दगड मारून तिथून पळवून लावलं. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

आरोपींपासून सुटका करून कशीबशी ती घरी पोहोचली. त्यानंतर तिने आपल्या घरच्यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर पीडिता आणि कुटुंबीय पोलीस स्थानकात गेले आणि या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

या दोन्ही आरोपींचा शोध जारी असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.