गेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतला, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सतत गेम खेळते म्हणून वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. इंदूरच्या चंदननगर भागामध्ये ही घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव खुशी असे असून ती 10 वी मध्ये शिकत होती.

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, खुशी रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत होती. यामुळे रागावलेल्या वडिलांनी तिच्या हातातून फोन काढून घेतला आणि तिला झोपण्यास सांगितले. यानंतर तिचे आई-वडील एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले. या दरम्यान खुशीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

कार्यक्रमासाठी बाहेर गेलेल्या आई-वडिलांनी खुशीच्या भावाला घरून हेडफोन आणण्यासाठी पाठवले. खुशी आतून दरवाजा उघडत नसल्याचे पाहून त्याने ही माहिती वडिलांना दिली. याची माहिती मिळताच वडील व कुटुंबीय घरी पोहोचले असता खुशीने गळफास घेतल्याचे दिसले. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या