मिरजमध्ये पाच लाखांचा गुटखा जप्त

मिरजेत टेम्पेतून वाहतूक करण्यात येत असलेला सुमारे पाच लाख रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखू गांधी चौकी पोलिसांनी रविवारी जप्त केली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी मिरज बसस्थानक परिसरातून जाणारा टेम्पो पोलिसांनी अडवून तपासणी केल्यानंतर अवैध गुटखा व सुगंधी तंबाखूचे बॉक्स 17 पोत्यांत भरल्याचे आढळले. या साठय़ाची किंमत सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांदरम्यान आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांना पाचारण करून गुटखा व तंबाखू साठय़ाची मोजदाद करण्यात आली. त्यांच्या फिर्यादीप्रमाणे टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकातून मिरजेत मोठय़ा प्रमाणात गुटखा तस्करी सुरू असून, मिरजेतून इतर ठिकाणी पाठविण्यात येत आहे. पोलिसांच्या वारंवार कारवाईनंतरही गुटखा व तंबाखू तस्करी सुरूच असल्याचे चित्र आहे.

आपली प्रतिक्रिया द्या