मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षारक्षकाच्या घरी ‘मिस फायर’

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षारक्षकाच्या रिव्हॉल्वरमधून चुकून सुटलेली गोळी पायाला लागून 13 वर्षीय तरुण जखमी झाल्याची घटना धनकवडीतील वनराईनगर भागात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन शिर्के असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी फिर्याद दिली आहे. शिर्के हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. त्यांच्याकडे रिव्हॉल्वरचे लायसन्स आहे.  कुठलीही सुरक्षिततेची काळजी न घेता शिर्के यांनी रिव्हॉल्वर असलेली बॅग कपाटात ठेवली. रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या भरलेल्या होत्या. मुलाचा बॅगला धक्का लागल्याने बॅग कपाटातून खाली पडली आणि त्यावेळी रिव्हॉल्वरमधून गोळी फायर झाल्याने ती मुलाच्या पायाला लागली. या घटनेत मुलगा किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.