नव्या मिस वर्ल्डचे आहे हिंदुस्थानशी कनेक्शन, वाचा कसे ते?

1113

जमैकाच्या टोनी एन सिंगने 2019 चा बहुप्रतिष्ठित मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. ती 69 वी विश्वसुंदरी ठरली आहे.

miss-world-1

टोनी एन सिंग ही जमैकाची जरी असली तरी तिचे हिंदुस्थानशी देखील कनेक्शन आहे. टोनीचे वडिल ब्रॅडशॉ सिंग हे हिंदुस्थानी कॅऱेबियन (indo caribbean) वंशांचे आहेत. तर तिची आई ही आफ्रिकन कॅरेबियन वंशाची आहे.

tony-with-parents

जमैकातील मोरंट बे येथे जन्मलेली टोनी एनचे कुटुंब ती नऊ वर्षांची असताना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे स्थायिक झाले.

tony-ann-singh-new2

23 वर्षीय टोनीने महिला व मानसशास्त्र या विषयात फ्लोरिडा स्टेट विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे. विद्यापीठात असताना ती कॅरेबियन स्टुडन्ट्स असोसिएशनची अध्यक्ष होती.

tony-ann-singh-new4

टोनी हीने याच वर्षी मिस जमैका ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिची निवड मिस वर्ल्ड साठी करण्यात आली. या स्पर्धेत तिला मिस टॅलेंटेडचा किताब देखील मिळाला आहे.

tony-ann-singh-new1

गायिका असून अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न आहे. तिने तिच्या या यशाचे सर्व श्रेय तिच्या आई वडिलांना दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या