
मिस वर्ल्ड 2025 स्पर्धा जिंकलेल्या थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगस्त्री हिने हिंदुस्थानातील अनेक मंदिरे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. या यादीत अयोध्येचे राममंदिर आहे. हिंदुस्थान आणि थायलंडदरम्यानच्या सांस्कृतिक नातेसंबंधांविषयी ओपल सुचाता म्हणाली, देशातील अनेक मंदिरे मला बघायची आहेत. माझ्यासाठी या जागा सुंदर आणि खास आहेत. हिंदुस्थान आणि थायलंडची संस्कृती, परंपरा एकमेकांशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे या जागांना भेट देणे, जाणून घेणे चांगला अनुभव आहे.