भाजप खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हरवला! दिल्लीमध्ये पोस्टरबाजी

1122

क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केल्यानंतर राजकारणात उतरलेल्या गौतम गंभीरविरोधात दिल्लीमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू हरवला आहे, असे पोस्टर्स दिल्लीमध्ये लावण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी दिल्लीकरांनी गंभीरला डोक्यावर घेतले होते, मात्र आता त्याच्याविरोधात पोस्टर्स झळकले आहेत. ‘भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर गायब आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर झालेल्या बैठकीपासून तो गायब आहे. इंदूरमध्ये जिलेबी खाताना त्याला अखेरचे पाहण्यात आले होते आणि संपूर्ण दिल्ली त्याचा शोध घेत आहे’, असे पोस्टर्स दिल्लीत झळकले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये आलेला क्रिकेटर गौतम गंभीर याने पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवली होती. येथे त्याने काँग्रेसचे अरविंदर सिंह यांचा 3,91,222 मतांनी दणदणीत पराभव केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या