रिया चक्रवर्तीचा नंबर समजून सुशांतच्या चाहत्यांनी या तरुणाला घातल्या शिव्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आत्महत्या करायला भाग पाडल्याचा तसेच त्याच्या खात्यातील पैसे लुटल्याचा आरोप त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर होत आहे, सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून रियावर मोठ्या प्रमाणात टीका केली. काहींनी तिला फोन करून देखील चार शब्द सुनावयचा प्रयत्न केला. मात्र या चाहत्यांच्या फोनचा त्रास रियाला झाला नाही तर हे फोन जात होते एका नवी मुंबईतील तरुणाला.

सागर सुर्वे असे त्या तरुणाचे नाव असून रिया व त्याच्या मोबाईलनंबर मध्ये फक्त एका अंकाचा फरक आहे. त्यामुळे सुशांतचे अनेक चाहते रिया ऐवजी सागरला फोन करत आहेत. अनेकजण तो रियाला फोन देत नाही असं समजून त्याला शिव्या देखील घालत आहेत. सागर या सततच्या फोनला वैतागला असून त्याने या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर काही दिवसातंच मला पहिला फोन आला. मी राँग नंबर सांगून ठेवला पण दिवसेंदिवस हे फोन वाढतच चालले आहेत. लोकांना हा राँग नंबर आहे हे सांगितला तर ते मला व्हिडीओ कॉल करायला सांगतात. फोन पाठवून काढायला सांगतात. गेल्या दहा वर्षापासून मी हा फोन नंबर वापरतोय. पण सध्या या सततच्या फोनमुळे मी हा फोन नंबर बंद ठेवला आहे. सध्या मी माझ्या मित्राचा एक नंबर वापरत आहे, असे सागर सुर्वेने पोलिसांना सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या