अनंत गिते दिल्लीत तर सुनिल तटकरे गल्लीत, निलम गोर्‍हे यांची सडकून टिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अलिबाग

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिंचन घोटाळे, धान्य घोटाळ्यातून जनतेची विश्वासहर्ता पुर्णपणे गमावली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीला साथ देणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पच्छातापाची वेळ येईल , अशी घणाघाती टिका शिवसेनेच्या नेत्या आमदार निलम गोर्‍हे यांनी केली. ‘सदाचारी व निष्कलंक राहून कारकीर्द गाजविणार्‍या अनंत गितेंना रायगड मतदारसंघातील सुज्ञ जनता सातव्यांदा पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून देईल. अनंत गिते हे दिल्लीत जातील तर सुनिल तटकरे गल्लीत राहतील’, असा विश्वास या सभेत निलम गोर्‍हे यांनी व्यक्त केला.

महायुतीचे 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारार्थ सुधागड तालुक्यातील 21 गणपती पाली मंदीरात सायंकाळी जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निलम गोर्‍हे बोलत होत्या. ” अनंत गिते सतत जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या सुखदुखात सहभागी होणारे नेते आहेत. गितेंच्या रुपाने कार्यक्षम सैनिक, कार्यक्षम मंत्री, कार्यक्षम खासदार रायगडकरांना लाभला हा समस्त रायगडवासीयांचा गौरव आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रायगडच्या जनतेवर नेहमीच विश्वास दाखविला आहे. रायगडपासून बारामतीपर्यंत अक्षरशः घराणेशाही फोफावली आहे. सामान्य जनतेने यांची जुलूमशाही मोडून काढली पाहिजे. सुनिल तटकरेंनी गावागावात भांडणे लावण्याची कामे केली. राष्ट्रवादी कॉग्रेस सोबत फरफटत जाणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पच्छाताप झाल्याशिवाय राहणार नाही. तटकरे यांनी सातत्याने जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी शिवसेना नेत्या आ. निलमताई गोर्‍हे, आ. प्रविण दरेकर, माजी मंत्री भा.ज.पा नेते रविंद्र पाटील, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख किशोरशेठ जैन, संपर्क प्रमुख विलास चावरी, भाजपा जिल्हा सरचिटणीस विष्णुभाई पाटील, सुनिल दांडेकर, भाजप जिल्हा चिटणिस राजेश मपारा, जि.प सदस्य रविंद्र देशमुख, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख सु.दा.भोय, शिवसेना सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, भा.ज.पा सुधागड तालुका प्रमुख राजेंद्र राउत, पंचायत समिती उपसभापती उज्वला देसाई आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.