
विधानसभेला निवडून आलो तरीही सत्तेची मस्ती कधी माझ्या डोक्यात शिरणार नाही. सत्तेचा वापर या पूर्वी एखादा कार्यकर्ता नीट करण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल करण्या करता केला गेल्यानेच त्यांना जनतेने घरी बसवले असल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा नामोल्लेख टाळून केली.
आमदार झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मतदारसंघातील तिसगाव, सातवड, देवराई, निंबोडी, राघोहिवरे, शिरापूर आदी गावांचा आभार दौरा केला. त्या नंतर तिसगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी संभाजी पालवे, भाऊसाहेब लवांडे, इलियास शेख, अनिल रांधवणे, राजेंद्र म्हस्के, सुनील पुंड, अमोल वाबळे, संजय लवांडे, अमोल वाघ, नितीन लवांडे, वहाब इनामदार, आर्षद शेख, राजू पठाण ,रफिक शेख आदी उपस्थित होते.

































































