बेकायदेशीर मशीदीच्या बांधकामाला विरोध केल्याने आमदार राजा सिंह यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैद्राबाद

हैद्राबादमधील भाजप आमदार राजा सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. हैद्राबादच्या अंबरपेटमधील एका मशीदीच्या बांधकामाला विरोध केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

राजा सिंह यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तसेच पोलिसांनी रझाकार सरकारच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.