
मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील मुख्य आरोपी उमेदवार शालन शिंदेपाठोपाठ तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मर्ढेकर यांनी आरोपींना पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आहे.
शालन शिंदे, अमर शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे, तानाजी बाबू शिंदे असे न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवार पेठेत मनसेचे विद्यार्थी शहरप्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांचा उमेदवारीच्या वादातून खून करण्यात आला. याप्रकरणी निवडणुकीतील उमेदवार शालन शिंदे, अमर शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे, तानाजी बाबू शिंदे यांच्यासह 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील शालन शिंदे व त्यांची मुले अमर शिंदे, अतिश शिंदे व तानाजी बाबू शिंदे यांना पोलीस कोठडी सुनावली होती. या चौघांची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱयांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मर्ढेकर यांच्याकडे केली होती. मात्र, आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करत चौघांच्याही पोलीस कोठडीची मागणी अमान्य करत सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.





























































