गो-तस्करीच्या संशयावरून पश्चिम बंगालमध्ये दोघांची जमावाकडून निर्घृण हत्या

660

पश्चिम बंगालच्या कुचबिहार जिल्ह्यातील पुतिमारी फोलेश्वरी गावातील गावकऱ्यांनी गो तस्करीच्या संशयावरून दोघांची बेदम मारहाण करीत निर्घृण हत्या केल्याचे खळबळजनक वृत्त आहे. जमावाने केलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेत मरण पावलेल्या युवकांची नावे प्रकाश दास आणि बाबुल मित्रा असल्याचे उघड झाले आहे. कुचबिहार पोलिसांनी या लिंचिंगप्रकरणी 14 गावकऱ्यांना अटक केली आहे.

कुचबिहारमधील मॉबलिंचिंगमधे ठार झालेले युवक आपल्या पिकअप व्हॅनमधून चोरीची जनावरे नेत असल्याचा संशय गावकऱ्यांना होता.पुतिमारी फोलेश्वरी गावातील गावकऱ्यांनी व्हॅनची तपासणी केली असता त्यांना गाडीत गाय आढळली. ही गाय हत्येसाठीच नेण्यात येत असल्याच्या संशयावरून गावकरी संतापले आणि त्यांनी व्हॅनमधील दोघांना बेदम मारहाण करत व्हॅनही पेटवून दिली.

पोलिसांना या घटनेची खबर मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मारहाण झालेल्या दोघांना तात्काळ कुचबिहारच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण उपचारादरम्यानच त्या दोघांचाही मृत्यू झाला. या मॉब लिंचिंगप्रकरणी गुन्हा दाखल करत कूचबिहार पोलिसांनी 14 गावकऱ्यांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या