मोबाईल इंटरनेट 1 डिसेंबरपासून महागणार

व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओ, बीएसएनएलने लवकरच मोबाईल डाटाचे दर वाढविण्याचे जाहीर केल्यामुळे इंटरनेट सेवा महागणार आहे. 1 डिसेंबरपासून मोबाईल इंटरनेट महाग होऊ शकते. याचा फटका कोटय़वधी ग्राहकांना बसणार आहे. चीन, जपान, दक्षिण कोरियाच्या तुलनेत हिंदुस्थानात मोबाईल इंटरनेट सेवा स्वस्त आहे असे कारण दरवाढीमागे देण्यात येत असले तरी टेलिकॉम कंपन्यांचा तोटा हे प्रमुख कारण असल्याचे पुढे आले आहे. हिंदुस्थानात एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे सर्वाधिक ग्राहक आहेत. दोन्ही कंपन्यांना आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टेलिकॉम कंपन्यांना 90 हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे व्होडाफोन-आयडिया 1 डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढविणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या