मोदींचा विरोधकांवर हल्ला,काही लोक सत्तेवाचून अक्षरशः तडफडतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-mumbai-e
फाईल फोटो

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

काही लोकांसाठी सत्ता ही ‘ऑक्सिजन’सारखी असते. त्यांना दोन-पाच वर्षे दूर राहावे लागले तर त्यांची अक्षरशः तडफड होत असते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर तोफ डागली. ते दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृत्यर्थ काढलेल्या 100 रुपयांच्या नाण्याचे अनावरण करताना बोलत होते. हे नाणे वाजपेयींच्या 94 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आले आहे.

वाजपेयी यांनी आपल्या राजकीय जीवनातील प्रदीर्घ काळ विरोधी पक्षाचे नेते म्हणूनच घालवला, पण त्यांनी सत्तेपेक्षा देशाच्या आणि जनतेच्या विकासाचाच ध्यास बाळगला होता, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. वाजपेयी यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण जनतेच्या कल्याणासाठी वेचला, असे ते म्हणाले. स्वतःपेक्षा आणि पक्षापेक्षा वाजपेयी यांनी सर्वाधिक महत्त्व देशाला आणि लोकशाहीला दिले होते, असे मोदी यांनी नमूद केले. या समारंभाला ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शहा हे उपस्थित होते.