भाजपात गेलेल्यांना केंद्रीय यंत्रणांचे संरक्षण? यादी देतो ईडी कारवाई करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या यंत्रणांचे संरक्षण आहे का? ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी कारवाई करा, असं आव्हानच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपामध्ये गेले आहेत. त्यांचं काय झालं? हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असं जयंत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

खडसे, मुश्रीफ यांच्यावरील आरोप जाणूनबुजून

एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत, तो मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमीनीचा व्यवहार केला आहे. हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत. तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे सर्व जाणूनबुजून केले जात आहे. अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला. त्यांनी पैसे घेतले नाही असं अधिकारी भुजबळ व संजय पाटील या अधिकाऱयांनी सांगितले आहे, असं जयंत पाटील म्हणाले.