कोल्हापूर शहरात ‘मोदी हटाव, देश बचाओ’चे लागले फलक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पाठोपाठ आता कोल्हापूर शहरातही आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाओ’ या आशयाचे फलक लागल्याने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांनी या फलकांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्याने हा चर्चेचा विषय बनला.

दरम्यान, हे फलक कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी दिल्लीत ‘आप’ने लावलेल्या फलका प्रमाणे हे फलक असल्याने येथील आपवर अंगुलीनिर्देश करण्यात येऊ लागले आहे. तर यासंदर्भात सायंकाळी येथील आपच्या पदाधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.

मोदी सरकार विरोधात विरोधी पक्ष एकवटत असतानाच गेल्या एकदोन आठवड्यापूर्वी दिल्ली शहरात आपने ‘मोदी हटाओ, देश बचाओचे’ हजारो फलक लावल्याने खळबळ उडाली होती. असाच प्रकार आज कोल्हापूर शहरात दिसून आला. रातोरात हे फलक लागले असून रंकाळा टॉवर, माऊली चौक, तलवार चौक, हॉकी स्टेडियम आदी चौकात हे फलक लागले आहेत.

ईडी, सीबीआयने सर्व चोर, भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये आणले! केजरीवाल यांचा पुन्हा हल्लाबोल

देशात राष्ट्रीय पातळीवरील घडामोडी, उद्योगपती अदानी समूहाच्या घोटाळ्यामुळे संसदेत सुरू असलेला गदारोळ, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी तडकाफडकीने रद्द केल्याचे प्रकरण ताजे असतानाच अशा आशयाचे बॅनर कोल्हापुरात लागल्याने खळबळ उडाली आहे.