मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रचारात पंतप्रधान मोदी, व्हिडीओ व्हायरल

886
arvind-kejriwal

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. संपूर्ण राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. आप आणि भाजपमध्ये प्रचारादरम्यान मीमयुद्धही पहायला मिळाले. आता मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रचारात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अवतरले आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारात एक तरुण मोदींचा मुखवटा घालून आला. त्याने केजरीवाल जिंदाबादच्या घोषणा देत त्याचा टिकटोक व्हिडीओही बनवला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आकाश सागर याच्या टिकटोक अकाऊंटवरून हा व्हिडीओ बनवला गेला आहे. नेटकर्‍यांनीही हा व्हिडीओ उचलून धरला असून मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या