मी खेळ पालटणार, पाचव्या दिवशीचा खेळ सुरू होण्याआधी सिराजने केलेला निर्धार

मोहम्मद सिराजने दिलेल्या जीवदानाच्या जोरावर हॅरी ब्रुकने ठोकलेले झंझावाती शतक, त्याला ज्यो रुटची लाभलेली साथ त्यामुळे पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडचे पारडे जड होते. इंग्लंडला पाचव्या दिवशी अवघ्या 35 धावांची गरज होती. मात्र अशा महत्त्वाच्या क्षणी मोहम्मद सिराजने तीन विकेट घेत इंग्लंडचा हाता तोंडाशी आलेला विजय खेचून टीम इंडियाकडे आणला. सध्या त्याच्या कामगिरीचे संपूर्ण क्रिडा विश्वातून कौतुक होत आहे.

मोहम्मद सिराजने दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करताना इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परत पाठवला. टीम इंडियाला त्याची गरज असताना नेमकं त्याने जरबदस्त गोलंदाजी करत विजय खेचून आणला. सिराजने दुसऱ्या सत्रात 104 धावा देत पाच विकेट घेतल्या. यात आजच्या दिवसातल्या शेवटच्या टप्प्यातील तीन विकेट्सचा समावेश आहे.

” काल हॅरी ब्रुकचा झेल सोडल्यानंतर मला काय वाटत होतं ते मी शब्दात सांगू शकत नाही. तो सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला असता. जर तो झेल मी घेतला असता तर त्यानंतरचं चित्र वेगळं असतं. आज सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा मी स्वत:लाच सांगितलं की मी हा सामना पलटणार. मी उठून ते एका कागदावर लिहले”, असे सिराजने विजयानंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

”माझा फक्त एकच प्लॅन होता की आपण सतत एकाच टप्प्यात मारा करायचा. मला अनेक गोष्टी हाताळून पाहायच्या नव्हत्या. त्यामुळे मी माझ्या प्लॅनवर फोकस होतो व त्याचे फळ मला मिळाले’, असे सिराजने सांगितले,