
अमेरिकेपाठोपाठ आता लंडनमध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध सुरू झाला आहे. आरएसएसच्या कार्यक्रमांवर ग्रेटर लंडन अथॉरिटी या शासकीय संस्थेने बहिष्कार टाकावा, अशी मागणी करणारे पत्र विविध संस्थांनी लंडनचे महापौर सादिक खान यांना लिहिले आहे.
आरएसएसच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती अभियानाचा भाग म्हणून मोहन भागवत यांचा अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये दौरे आयोजित केले आहेत. गेल्या आठवडयात भागवत हे अमेरिकेत असताना न्यूयॉर्क येथील त्यांच्या कार्यक्रमाला विरोध झाला होता. आता ब्रिटनमध्येदेखील अशाच पद्धतीने विरोध होत आहे. लंडन येथे भागवत भारतीय समुदायाला संबोधित करण्याची शक्यता आहे. मात्र, या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये, असे पत्र सादिक खान यांना विविध संस्थांनी लिहिले आहे. लेबर पार्टीचे माजी नेते जेरेमी का@र्बिन यांनीही आरएसएसच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे.































































