पबजी खेळण्यास रोखले म्हणून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

1281

आंध्र प्रदेशमध्ये एका 14 वर्षीय मुलाला पबजी खेळण्यास रोखल्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे. बोया लोहित असे मृत मुलाचे नाव असून तो दहावीत शिकत होता. 

बोया या मुलाला पबजी या मोबाईल गेमचे व्यसन लागले होते. तो दिवसे रात्र हा गेम खेळत असे. त्यामुळे त्याचे अभ्यासात कमालीचे दुर्लक्ष झाले. 20 ऑगस्ट रोजी तो पबजी खेळत होता. तेव्हा आईने पाहिले की तो अभ्यास करण्याऐवजी पुन्हा पबजी खेळत आहे. तेव्हा आई त्याला ओरडली आणि त्याच्या हातून मोबाईल काढून घेतला. तेव्हा बोया खूपच चिडला. तेव्हा त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या पालकांनी तातडीने त्याला इस्पितळात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर बुधवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

आपली प्रतिक्रिया द्या