जगभरात मंकीपॉक्सचा कहर पाहायला मिळतोय. मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या सख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. आधी कोरोना तर आता मंकीपॉक्सने जगभरात चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे. हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. या आजारातून लवकर बरे होऊ शकतो. परंतू त्यापासून गंभीर आजारही उद्भवू शकतो. मंकीपॉक्समुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो का? यावर तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
मंकीपॉक्समुळे मेंदूचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे एन्सेफलायटीस, मेंदूज्वर यांसारख्या समस्या होऊ शकतात. या समस्यांमध्ये मेंदूला सूज येते ज्यामुळे रुग्णाला डोकेदुखी, ताप यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. तसेच यामध्ये रुग्णाच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याभोवती पडद्याला सूज येते. यानंतर संपूर्ण शरीरावर पुरळ येण्यास सुरुवात होते. मंकीपॉक्सचा त्वचेवर आणि श्वसनमार्गावर परिणाम होतो. पण काही रुग्णांच्या मज्जसंस्थेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मेंदूंच्या पेशींचे नुकसान होते. या आजारावर सध्यातरी लस उपलब्ध झालेली नाही. तरीहि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने लवकरच या आजारावर लस उपलब्ध होईल, असे सांगितले आहे.
मंकीपॉक्स टाळण्यासाठी , सर्दी खोकला असलेल्या लोकांपासून दूर रहा. संक्रमित व्यक्तीच्या वापरलेल्या गोष्टी वापरू नका. स्वच्छतेची काळजी घ्या. आणि मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.