नाशिकमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जादा बसेस; पोलीस बंदोबस्तात वाढ

558

महाशिवरात्रीनिमित्ताने आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील तीर्थक्षेत्री जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरला गुरुवारपासून शनिवारपर्यंत तीन दिवस 98 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

भगूरहून सर्वतीर्थ टाकेदसाठी 38, घोटीहून कावनईसाठी 47 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सोमेश्वर, कपालेश्वर, शिरसमणी, पारेगाव, नागापूर, दोधेश्वर येथे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी जादा बसेस धावतील. सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या