इटलीत कोरोनाचा कहर, 15 हजारहून अधिक मृत्यू

720
फोटो- प्रातिनिधीक

जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. जगभरात 12 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 69 हजार 444 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात 1200 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सगळ्यात जास्त कहर इटलीत झाला आहे. इटलीत आतापर्यंत 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

युरोपीयन देशात कोरोनाचे संकट वाढले आहे. इटलीत आतापर्यंत 15 हजार 887 जणांचा मृत्यू झाला आहे. तर  स्पेनमध्ये 12 हजार 641 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 694 जणांचा मृत्यू आहेत. स्पेनमध्ये एकूण 1 लाख 31 हजार 646 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेतही कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 3 लाख 37 हजार 310 जणांना लागण झाली आहे. रविवारी 25 हजार 316 जणांना लागण झाली आहे. गेल्या 24 तासात 1200 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या