
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या 17 लाख भाविकांनी केदारनाथ बाबाचे दर्शन घेतले आहे. केदारनाथ बाबाचे कपाट बंद होण्यास अजून आठवडा शिल्लक आहे तरीही दररोज या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. 13 ऑक्टोबरला अवघ्या एका दिवसात केदारनाथ धामवर 12 हजार भाविक पोहोचले. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला कपाट बंद करण्यात आले होते. या वेळी मात्र एक आठवडय़ाआधीच कपाट बंद केले जातील. गेल्या वर्षी 16 लाख 52 हजार भाविकांनी केदारनाथ बाबांचे दर्शन घेतले होते.
गुगलचे पहिले एआय हब आंध्र प्रदेशात
गुगल पंपनी हिंदुस्थानात 15 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 1.33 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली. पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली आहे. गुगलचे पहिले एआय हब आंध्र प्रदेशात बांधले जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले. एआय हब हिंदुस्थानची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करणार आहे.
वांगचुक अटक : 29 ऑक्टोबरला सुनावणी
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी आपल्या याचिकेत संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. गीतांजली यांच्या या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालय येत्या 29 ऑक्टोबरला सोनम वांगचुक यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत ताब्यात ठेवण्याचा पेंद्र सरकारच्या निर्णयाला गीतांजली अंगमो यांनी आव्हान दिले आहे.
अमेरिकेकडून सहा विदेशी नागरिकांचा व्हिसा रद्द
अमेरिकेतील चार्ली किर्प यांच्या हत्येसंबंधी सोशल मीडिया एक्सवर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी सहा विदेशी नागरिकांचा व्हिसा अमेरिकेने रद्द केला आहे. ज्या सहा नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला, त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, अर्जेटिना, मेक्सिको, ब्राझील, जर्मनी आणि पेराग्वेमधील व्यक्तीचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला, त्यांनी चार्ली किर्प यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती.
चार्ली किर्प यांना ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवंगत युवा पंझर्वेटिव्ह नेते चार्ली किर्प यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ पुरस्कार दिला. चार्ली यांची मागील महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चार्ली किर्प यांच्या पत्नीने स्वीकारला. ‘व्हाईट हाऊस’च्या रोज गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. चार्ली किर्प हे एक सच्चे अमेरिकन हिरो होते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी या वेळी म्हटले.